लोकप्रिय पबजी गेम बाबत रोचक माहिती


जगाला वेड लावणारा खेळ म्हणून पबजी बद्दल उलटसुलट अनेक मतप्रवाह व्यक्त होत असतात. काहीही असले तरी जगभरात या गेमच्या युजर्सची संख्या वाढत चाललेली आहे हे नाकारता येत नाही. एकट्या भारतात या गेमचे ३ कोटी युजर्स आहेत तर २० कोटीपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाऊनलोड केला आहे. या गेमविषयी काही रोचक माहिती येथे देत आहोत.

सप्टेंबर २०१७ मध्ये या गेमने अविश्वसनीय विक्रम केला आहे. तेव्हा एकाचवेळी १,३४२,८५७ युजर्स हा गेम खेळले. अर्थात फॅरनहिट या गेमने हे रेकॉर्ड फेब्रुवारी २०१८ मध्ये मोडल्याचे म्हटले जात असले तरी फॅरनहिट हे पीसी फ्री गेम आहे आणि पबजी पीसी फ्री गेम नाही. सुपरडाय रिसर्च सांगतो, पबजी जगातील १० सर्वाधिक कमाई केलेल्या गेममध्ये सामील आहे..

पबजीचे पहिले व्हर्जन स्टीम प्लॅटफॉर्मवर आले तेव्हा १ महिन्यात त्याच्या २० लाख कॉपीज विकल्या गेल्या होत्या. आज हा गेम एक्स बॉक्स, पीसी, प्ले स्टेशन आणि मोबाईलवर उपलब्ध आहे. हा गेम बॅटल रॉयल या जपानी चित्रपटावर बेतलेला आहे.

या गेममध्ये जे ब्ल्यू झोन फिचर आहे ते सोव्हिएत संघाच्या लष्कारावरून घेतले गेले आहे. यात सोव्हिएत सेना घुसखोरांना दूर ठेवण्यासाठी मशीनच्या सहाय्याने पूर्ण जमिनीवर हाय व्होल्टेज करंट सोडत असे. जगातील बहुतेक सर्व गेम लोकप्रियतेसाठी जाहिरातींचा आधार घेतात मात्र पबजीने लोकप्रियता वाढविण्यासाठी जाहिरातींवर अजिबात खर्च केलेला नाही.

Leave a Comment