आता मराठीतही बोलणार गुगलचा Assistant


गुगल फॉर इंडियाच्या कार्यक्रमात देशातील गुगल असिस्टंट युजर्ससाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता मराठीसह अन्य नऊ भाषांमध्ये युजर्सना गुगल असिस्टंटला आज्ञा देता येणार आहेत. गुगल असिस्टंट ‘ok google speak to me in marathi’ अशी आज्ञा दिल्यानंतर मराठीत संवाद साधेल.


त्याचबरोबर ‘ओके गुगल हिंदी बोलो’ किंवा ‘Talk to me in Hindi’ अशी आज्ञा गुगल असिस्टंटला दिल्यावर गुगल असिस्टंट हिंदीत संवाद साधेल. युजर्स अशा आज्ञा गुजराती, तेलगू, उर्दू, बंगाली आणि कन्नड भाषेतही देऊ शकतात. “Ok Google, Hindi news.” अशी आज्ञा युजर्सने दिल्यानंतर हिंदी भाषेतही बातम्या वाचता येणार आहेत. त्याचप्रमाणे ‘गुगल बोलो अ‍ॅप’ची सेवा ही आता मराठी, बांगला, तमिळ, तेलगू आणि उर्दूतही अपडेट करण्यात आली आहे.

Leave a Comment