टोक्यो ऑलिम्पिकसाठी कोटा मिळविणारी विनेश पहिली भारतीय पहिलवान


टोक्यो ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवून पहिलवान विनेश फोगाट हिने पहिली भारतीय पहिलवान बनविण्याची कामगिरी केली आहे. बुधवारी विश्वचँपियनशिप मध्ये तिने ५३ किलो वजनी गटात दोन सामने जिंकून हा कोटा मिळविला तसेच माजी विश्वचँपियन ब्राँझ विजेती युक्रेनची युलिया खालवादानी हिचा ५-० ने पराभव केला. दुसऱ्या बाऊट मध्ये तिने सिल्व्हर मेडल विजेत्या साराह हिल्डेब्राईट हिला ८-२ ने मात दिली आणि प्ले ऑफ मध्ये तिचे स्थान पक्के केले.

त्यानंतर तिने ग्रीसच्या मारिया प्रेवोलारस्किला हरवून ब्राँझ पदकाची कमाई केली. पहिल्या तीन विश्वचँपियनशिप मध्ये विनेशला पदक मिळविता आले नव्हते. पण मारियाला चित् करून तिने पदकाचा दुष्काळ संपविला. विनेश म्हणाली, माझा वजनगट नुकताच बदलला आहे, त्यामुळे पदक मिळविणे ही माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. करियर मधील हे सर्वात मोठे पदक आहे आणि त्याचा मला आनंद झाला आहे.

Leave a Comment