टीवीएसने लाँच केले Ntorq 125 चे स्पेशल एडिशन


टीवीएसने आपली लोकप्रिय स्कूटर Ntorq 125 चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. VS Ntorq 125 Race Edition नावाने आलेल्या या मॉडेलची किंमत 62,995 रूपये आहे. आधीच्या मॉडेल पेक्षा या मॉडेलची किंमत 3 हजार रूपये जास्त आहे. या नवीन मॉडेलमध्ये T आकाराच्या एलईडी हेडलाइटबरोबरच नवीन एलईडी हेडलाईट देखील दिली आहे.

नवीन एलईडीबरोबर या स्कूटरमध्ये युनिक कलर स्कीम देखील आहे. याच्या बॉडी पॅनलला रेड, ब्लॅक आणि सिल्वर कलर आहे. याचबरोबर आता टीवीएस एनटॉर्क 8 वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. यामध्ये 3 मॅटेलिक आणि 5 मॅटफिनिशिंग आहे. स्पेशल एडिशनमध्ये मॅकेनिकली कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

(Source)

एनटॉर्कमध्ये 124.8 सीसी, सिंगल सिलेंडर एंजिन देण्यात आले आहे. जे 7,500rpm वर 9.4hp  पॉवर आणि 5,500rpm वर 10.5Nm टॉर्क जनरेट करते.

एनटॉर्क 125 कंपनीची लोकप्रिय स्कूटर आहे. 7 महिन्यांपेक्षा कमी वेळेत या स्कूटरची एक लाख युनिटची विक्री झाली होती. काही दिवसांपुर्वी कंपनीने एमटॉर्क ड्रम ब्रेक व्हेरिएंट लाँच केले होते. त्याची किंमत 58,552 रूपये आहे.

(Source)

टीवीएस कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट (मार्केटिंग) अनिरूध्द हलधर यांनी सांगितले की, एनटॉर्क हे मॉडेल ग्राहकांमध्ये खुपच लोकप्रिय आहे. अनेक मुख्य शहरांमध्ये या स्कूटरची प्री बुकिंग देखील सुरू करण्यात आलेली आहे.