अमेरिकेतील प्रतिष्ठित पुरस्काराने होणार आनंद कुमार यांचा सन्मान


आयआयटी प्रवेश परिक्षाची तयारी करून घेणारी कोचिंग संस्था ‘सुपर 30’ चे संस्थापक आणि गणितज्ञ आनंद कुमार यांचा अमेरिकेत एका प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिलेल्या योगदानासाठी देण्यात आला आहे. आनंद कुमार यांना फाउंडेशन फॉर एक्सीलेंस (एफईई) संघटनेने ‘द एज्युकेशन एक्सिलेंस अवॉर्ड 2019’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या संघटनेला 25 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आनंद कुमार यांचा सन्मान करण्यात आला.

आनंद कुमार या कार्यक्रमात भाषणादरम्यान म्हणाले की, लोकांपर्यंत गुणवत्तापुर्ण शिक्षण पोहचवल्याने जगात मोठे बदल होतील. यामुळे गरीबी, बेरोजगारी, लोकसंख्या विस्फोट, पर्यावरण संरक्षण सारख्या अनेक समस्या सोडवण्यास मदत होईल.

ते म्हणाले की, भारतीय नागरिक अमेरिकेसहित जगातील विविध भागात चांगले कार्य करत आहे. जेव्हा आपण आपल्या समाजाला काहीतरी परत करतो, तेव्हा अधिक समाधानकारक वाटते. शिक्षणापेक्षा अधिक किंमती दुसरी कोणतीही भेटवस्तू नाही.

आनंद कुमार मागील 18 वर्षांपासून गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवा यासाठी सुपर 30 ही कोचिंग संस्था चालवत आहेत. काही दिवसांपुर्वीच आनंद कुमार यांच्यावर आधारित सुपर 30 चित्रपट रिलीज झाला होता.

Leave a Comment