26 सप्टेंबरला वन प्लस लाँच करणार हा स्मार्टफोन


वन प्लस कंपनीने 26 सप्टेंबरला एक इव्हेंटचे आयोजन केले असून, या इव्हेंटमध्ये कंपनी वन प्लस 7 टी हा स्मार्टफोन लाँच करेल. कंपनीने काही दिवसांपुर्वीच फोनचे डिझाईन रिविल केले आहे. त्यानुसार, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असणार आहे. तसेच, लाँचच्या आधीच वन प्लस 7टी हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे.

कंपनी ‘guess the specs’ नावाने एक कॉन्टेस्ट देखील चालवत असून, जर युजर्सने फोनच्या स्पेक्सबद्दल योग्य माहिती दिली तर अ‍ॅमेझॉनकडून युजर्सला गिफ्ट देखील मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनवर जाऊन तुम्हाला नॉटिफाय मी बटनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला फोनच्या लाँच आणि फिचर्सबद्दल माहिती मिळेल. कंपनी या इव्हेंटमध्ये वन प्लस टिव्ही देखील लाँच करणार आहे.

(Source)

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला असून, यात सर्कुलर कॅमेराबरोबर एलईडी फ्लॅश देखील आहे. तर बॅकपॅनेलला वन प्लसचा लोगो देण्यात आला आहे. डिव्हाईस मॅट ब्ल्यू रंगामध्ये दाखवण्यात आला आहे. सांगण्यात येत आहे की, कंपनी एकाच व्हेरिएंटमध्ये हा फोन लाँच करेल.

(Source)

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, वन प्लस 7 टी मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर देखील असेल. यामध्ये पॉप सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला नाही. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

Leave a Comment