आता कुमार सानुंसाठी गाणे गाणार रानू मंडल ?


सध्या रानू मंडल यांच्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपुर्वीच रानू यांचे पहिले गाणे ‘तेरी मेरी कहाणी’ रिलीज करण्यात आले. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच त्यांच्या चाहत्या वर्गातही वाढ झाली आहे. हिमेश रेशमियासोबत गायलेले गाणे हिट झाल्यानंतर आता रानू मंडल यांच्यासोबत गायक कुमार सानूही गाणे रेकॉर्ड करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फक्त रानू आणि रानू अशी एकच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हिमेश रेशमियानेही ‘तेरी मेरी कहाणी’ गाण्याच्या जबरदस्त यशानंतर रानू मंडल यांच्यासोबत त्याच्या आगामी ‘हार्डी अॅन्ड हीर’ या चित्रपटात ‘आदत’ हे आणखी एक गाणे रेकॉर्ड केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा मेकिंग व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. हिमेश आणि रानू मंडल यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हिमेशने तेरी मेरी कहाणी या गाण्याच्या प्रदर्शनाआधीही मेकिंग व्हिडीओ शेअर केला होता, त्यामुळे प्रदर्शनाआधीच हे गाणे तुफान व्हायरल झाले होते. तेरी मेरी कहाणी गाण्याला प्रदर्शनानंतर काही दिवसातच 41 दक्षलक्षहून अधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता.

Leave a Comment