नोकियाचा जबरदस्त स्मार्टफोन लाँच


एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतीय बाजारात नोकिया 7.2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा आणि प्योर डिस्प्ले असणारा हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला असून, 23 सप्टेंबरापासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.

नोकिया 7.2 स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, एचडीआर 10 सपोर्ट, गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टशन देखील मिळेल. याचबरोबर या लेटेस्ट ओएस अँड्राइड पाय देण्यात आला असून, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरवर हा फोन कार्यरत असेल.

(Source)

कॅमेऱ्याविषयी सांगायचे तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल सेकेंडरी आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेरा आहे. तर फ्रंटला 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

यात 3500 एमएएच बॅटरी आहे. त्याचबरोबर कनेक्टिविटीसाठी 4जी, वाई-फाई 802.11, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट यात मिळेल.

(Source)

किंमतीबद्दल सांगायचे तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 18,599 रूपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 19,599 रूपये आहे.