वॉक्सवेगनची Ameo GT Line कार लाँच


प्रसिध्द कार कंपनी वॉक्सवेगनने Ameo GT Line एडिशन लाँच केले आहे. याआधी कंपनीने सप्टेंबरमध्ये Polo फेसलिफ्ट आणि Vento फेसलिफ्ट लाँच केली होती. Ameo GT Line च्या फिचर्सबद्दल जाणून घेऊया.

इंजिनबद्दल सांगायचे तर यामध्ये 1.5 लिटरचे 4 सिलेंडर, टर्बोचार्ज्ड, कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 110hp पॉवर आणि 250 Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिनला 7 7 DSG ऑटोमॅटिक गियरबॉक्स देखील देण्यात आले आहे.

(Source)

या कारमध्ये 16 इंच Portago एलॉय व्हील, ब्लॅक ओआरवीएम, ब्लॅक रूफ, ब्लॅक जीटी लाइन स्पॉइलर, नवीन साइड फॉयल आणि फेंडरवर जीटी लाइन बॅज सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

(Source)

वॉक्सवेगन Ameo GT Line ची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रूपये आहे. सध्या बाजारात Ameo GT Line चे ऑटोमॅटिक ट्रांसमिशन असणारे डिझेल इंजिन व्हेरिएंटच आले आहे.

वॉक्सवेगन एमियो जीटी लाइन आता फोर्ड एस्पायर, मारुती सुझुकीची डिझायर, होंडा अमेज आणि ह्युंडई एक्सेंट या कारना टक्कर देईल.