या 6 बॉलीवूड स्टार्सनी गुप्त ठेवले होते त्यांचे लग्न


काही बॉलीवूड स्टार्स प्रसिद्धीच्या झोतात असूनही ते आपल्या काही गोष्टी गुप्त ठेवतात. कधीकधी लोकांना त्यांच्याबद्दल वर्षानुवर्षे माहित नसते. असे सेलेब्सही आहेत ज्यांनी लग्नाची गोष्ट बराच काळ लपवून ठेवली. आज आम्ही तुम्हाला अशा 6 जोड्यांबद्दल सांगणार आहोत.

मेघना नायडू आणि लुईस
‘कालियों का चमन’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मेघना नायडूने एका पोर्तुगीज टेनिस खेळाडूशी छुप्या पद्धतीने लग्न केले. हे लग्न तिने 2 वर्ष लपवून ठेवले. जेव्हा त्यांच्या लग्नाचे गुप्त फोटो समोर आले तेव्हा हा खुलासा झाला. मेघनाने 25 डिसेंबर 2016 रोजी मुंबईत लग्न केले. लग्नाआधी मेघना आणि लुईस 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

रेखा आणि विनोद मेहरा
रेखा आणि विनोद मेहराच्या लग्नाबद्दल असे म्हणतात की, विनोद मेहरा रेखाशी लग्न करण्यासाठी आपल्या आईला पटवून देऊ शकला नाही. कोलकातामध्ये त्यांचे लग्न झाले तेव्हा रेखाने त्याला विमानतळावरून थेट आपल्या घरी नेले आणि रेखा विनोद मेहरांची आई कमला मेहरा यांच्या पाया पडली. विनोद मेहरांच्या लाख प्रयत्नानंतरही विनोदच्या आईने रेखाला स्वीकारले नाही आणि त्यांचे संबंध संपुष्टात आले.

जॉन अब्राहम आणि प्रिया रुचाल
जॉन अब्राहमचे बिपाशा बासू सोबत असलेल्या संबंधांची बरीच चर्चा झाली. पण त्यांच्या लग्नाविषयी कोणालाही माहिती नव्हते. प्रिया रुचालसोबत त्याने केलेले लग्न खूप काळानंतर उघड झाले. प्रियाला तो अजूनही मीडियापासून खूप लांबच ठेवतो.

साजिद नाडियाडवाला आणि दिव्या भारती
काळाआधी जग सोडून गेलेल्या दिव्या भारतीने निर्माते साजिद नाडियाडवालाशी लग्न केले. पण हे लग्न अगदी गुप्तपणे झाले. याबद्दल त्याच्या काही मित्रांनाच माहिती होती.

जूही चावला आणि जय मेहता
जूही चावला बराच काळ जय मेहता हा आपला चांगला मित्र असल्याचे सांगत होती. बर्‍याच दिवसानंतर हा भेद उघड झाला की दोघेही पती-पत्नी आहेत.

Leave a Comment