एकाच सामन्यात या गोलंदाजाने गारद केले 17 गडी


दक्षिण अफ्रिकेचा माजी गोलंदाज काइल एबॉट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 32 वर्षीय काइल एबॉटने हॅम्पशायरकडून खेळताना एकाच सामन्यात 86 धावा देत 17 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने ही कामगिरी काउंटी चॅम्पियनशीप डिव्हिजन 2019 स्पर्धेत समसेट विरूध्दच्या सामन्यात केली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मागील 63 वर्षातील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. इंग्लंडचे ऑफ स्पिनर जिम लेकर यांनी 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी सामन्यात 90 धावा देत 19 विकेट्स घेतले होते.

साउथेम्पटनच्या द रोज बाउल येथे हॅम्पशायरच्या संघाने पहिल्या डावात 196 धावा केल्या. यानंतर एबॉटने शानदार गोलंदाजी करत समरसेट संघाला 142 धावांवर रोखले. एबॉटने मुरली विजयबरोबर 9 खेळाडूंना (18.4-9-40-9) बाद केले. फिडेल एडवर्ड्सने एक विकेट घेतली.

एबॉटने हॅम्पशायरच्या दुसऱ्या डावात कर्णधार जेम्स विंसबरोबर 119 धावांची महत्त्वपुर्ण भागिदारी देखील केली. या भागिदारीच्या जोरावर हॅम्पशायरने दुसऱ्या डावात 226 धावापर्यंत मजल मारली. यानंतर 281 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला समरसेट संघ दुसऱ्या डावात 144 धावांवर ढेर झाला. या सामन्यात हॅम्पशायरने 136 धावांनी विजय मिळवला. या डावात एबॉटने 8 विकेट्स (17.4-3-46-8) घेतले. संपुर्ण सामन्यात एबॉटने 17 विकेट्स घेत विक्रम केला आहे.

Leave a Comment