जमिनीतील दुर्मिळ घटकांचा वापर करून करणार आयफोनची निर्मिती


अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपुर्वीच आयफोन 11 सीरिज लाँच केली आहे. आता कंपनीने जमिनीतील दुर्मिळ घटकांचा आयफोन निर्मितीसाठी वापर करणार असल्याचे सांगितले आहे.

कंपनीने सांगितले की, रिसायकिल करता येणाऱ्या दुर्मिळ घटकांचा वापर हा फोनमधील टॅप्टिक इंजिन बनवण्यासाठी केला जाणार आहे. आयफोनमधील या पार्टचा एकतृतीयांश भाग बनवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

या दुर्मिळ घटकामध्ये 17 विशिष्टं खनिजांचा समावेश आहे. या दुमिळ घटकांमुळे चीन आणि अमेरिकेतील ट्रेडमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीन या घटकांचा वापर हत्यार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इत्यादी गोष्टी बनवण्यासाठी करतो. या दुर्मिळ घटकांवर चीनचे वर्चस्व असून, हे घट अमेरिकेत विक्री करण्यास चीनने बंदी आणली आहे.

अ‍ॅपलचे अधिकारी जॅक्सनने सांगितले की, या घटकाच्या वापराच्या कोणत्याही प्रकारे ट्रेडवर परिणाम होणार नाही. कधीकधी उद्योग आणि पर्यावरणाच्या हितासाठी असा योगायोग जुळून येणे खरचं आनंदाची गोष्ट आहे.

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे घटक छोटे स्पिकर्स आणि एक्टिट्युटोर्समध्ये वापरले जातात. हे घटक एवढे छोटे असतात की, ते रिसायकिल करणे अवघड आणि खर्चिक असते. अ‍ॅपल याआधीही डिव्हाईसमधील पार्ट्सचा रिसायकिल करून वापर करत आहे. अ‍ॅपल रोबोटचा वापर करून हे दुर्मिळ घटक फोनमधून काढून पुन्हा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment