भारतीयांसाठी गुगल सर्चमध्ये झाले हे बदल


गुगल फॉर इंडिया इव्हेंटच्या दरम्यान कंपनीने भारतासाठी अनेक सेवांची घोषणा केली आहे. यामध्ये हिंदी भाषा प्रमुख होती. कंपनीच्या मते भारतीय मोठ्या प्रमाणात हिंदी सर्च करत आहेत.

या इव्हेंट दरम्यान कंपनीने ‘इंटरनेट साथी’ या प्रोग्रामबद्दल देखील माहिती दिली. इंटरनेट साथी हा गुगलचा एक प्रोग्राम आहे, ज्याच्या अंतर्गत ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिविटी पोहचवली जाईल.

गुगलने ‘गुगल फॉर इंडिया’ इव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटिलिजेंसबद्दल देखील माहिती दिली. कंपनीने बंगळुरूमध्ये AI Lab सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. भारतासाठी सर्च रिजल्टमध्ये देखील बदल करण्यात येत आहेत. भारतीय भाषांसाठी सर्च रिजल्ट नवीन प्रकारे दिसतील. आधीपेक्षा अधिक पर्सनलाइज्ड आणि अधिक चांगले रिजल्ट मिळतील.

डिस्कवर टॅब – डिस्कवर टॅबमध्ये आता प्रत्येक भाषेचे कॉन्टेंट दिसतील. डिस्कवर टॅब अधिक कस्टमाइज केला जाऊ शकतो. येथे वेगवेगळे पर्याय देण्यात आलेले आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या बातम्या आणि स्टोरीज बघू शकाल. डिस्कवर टॅब गुगल सर्च, गुगल गो आणि क्रोममध्ये उपलब्ध आहे.

गुगल लेन्स – गुगल लेन्सच्या मदतीने तुम्ही बोर्डवर लिहिण्यात आलेला कॉन्टेंट रिअल टाइम ट्रांसलेट करू शकता. भाषांतर तुम्ही ऐकू देखील शकता. हे तीन भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून, गुगल लेन्सद्वारे दुसऱ्या भाषेतील साइन बोर्ड स्कॅनकरून तुम्ही तुमच्या भाषेत भाषांतर करू शकता.

Leave a Comment