फेसबुकने लाँच केले तीन होम कॉलिंग डिव्हाईस


फेसबुकने होम व्हिडीओ कॉलिंग पोर्टलचे तीन नवीन डिव्हाईस लाँच केले आहेत. यामध्ये री-डिझाईन पोर्टल, पोर्टल मिनी आणि पोर्टल टिव्हीचा समावेश आहे. या डिव्हाईसद्वारे व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग करता येईल. याचबरोबर याचा डिजीटल फोटो फ्रेम म्हणून देखील वापर करता येईल. पोर्टलची किंमत 13 हजार रूपये आणि पोर्टल मिनीची किंमत 9 हजार रूपये आहे. कंपनी या डिव्हाईसची विक्री युके, फ्रांस, स्पेन व अन्य 6 देशात करणार आहे.

(Source)

पोर्टल, पोर्टल मिनी – 

हे नवीन पोर्टल डिजीटल फोटो फ्रेम प्रमाणेच वाटतात. पोर्टलमध्ये 10 इंचचा एचडी डिस्प्ले आहे. तर मिनी पोर्टलमध्ये 8 इंचचा एचडी डिस्प्ले मिळेल.

दोन्ही डिव्हाईस रूममधील लाईटीप्रमाणे डिस्प्लेचा रंग आणि ब्राइटनेस एडजेस्ट करतील, ज्यामुळे चांगली फोटो-व्हिडीओ क्वालिटी मिळेल. याचबरोबर यात इन-बिल्ट कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्पीकर आहे.

नवीन पोर्टलमध्ये आर्टिफिशियल टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आलेला असून, या पोर्टलची विक्री 13 ऑक्टोंबरपासून सुरू होईल.

(Source)

पोर्टल टिव्ही – पोर्टल टिव्हीविषयी सांगायचे तर यात व्हिडीओ कॉलिंग आणि म्युझिक स्ट्रिमिंगसाठी इनबिल्ट स्पीकर देण्यात आलेला आहे. याचबरोबर हे डिव्हाईस टिव्हीला देखील कनेक्ट करता येणार आहे. यामध्ये 12.5 मेगापिक्सल कॅमेरा आहे, ज्यात 120 डिग्री व्यू मिळतो.

टिव्हीला डिव्हाईस कनेक्ट करून व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर कॉल करता येतील. या डिव्हाईसची किंमत 11 हजार असून, 5 नोव्हेंबरपासून याची विक्री सुरू होईल.

Leave a Comment