स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’मधून उड्डाण घेणार राजनाथ सिंह पहिले संरक्षणमंत्री


केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानातून बंगळुरू येथील एलएएल विमानतळावरून उड्डाण केले. ते ह्या विमानातुन उड्डाण घेणारे पहिले संरक्षणमंत्री आहेत. या विमानाचा तीन वर्षांपुर्वीच वायुदलात समावेश करण्यात आलेला आहे. आता तेजसचे अपग्रेडेट व्हर्जन देखील येणार आहे. याआधी माजी संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी लढाऊ विमान सुखोईमधून उड्डाण केले होते.

राजनाथ सिंह यांच्याबरोबर एअर वाइस मार्शल एन तिवारी हे देखील उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी काही वेळासाठी विमान कंट्रोल देखील केले होते, असे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी सांगितले.

83 नवीन तेजस लढाऊ विमाने तयार करण्यासाठी एचएएलला सरकारकडून 45 हजार कोटींचा निधी मिळणार आहे.

उड्डाणानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, हे उड्डाण खूपच आरामदायी होती, मी या उड्डाणाचा आनंद घेतला. तेजस हे स्वदेशी बनावटीचे विमान असल्याने याची निवड केली. इतर देश देखील हे विमान खरेदी करण्यास रस दाखवत आहेत.

Leave a Comment