सर्वेक्षण : देशातील जनतेला सर्वाधिक लष्करावर भरवसा


शहरी भागातील 70 टक्क्यांपेक्षा अधिक भारतीय हे सैन्याला सर्वाधिक विश्वासार्ह्य प्रोफेशन समजतात. तर यातील बहुतांश लोक हे राजकीय नेत्यांना संशयाच्या दृष्टीने बघतात. ही माहिती एका सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे. मार्केट रिसर्च फर्म इफ्सोसच्या अभ्यासानुसार, वैज्ञानिक आणि शिक्षकांनी विश्वासार्ह्य नोकरी म्हणून क्रमशः दुसरे व तिसरे स्थान मिळवले आहे.

ग्लोबल ट्रस्ट इन प्रोफेशंस या शीर्षकाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, कमीत कमी 59 टक्के भारतीय हे राजकारणाला सर्वाधिक विश्वास नसलेले प्रोफेशन समजतात. त्यानंतर सरकारचे मंत्री (52 टक्के) आणि जाहिरात अधिकारी (41 टक्के) यांचा क्रमांक आहे.

इप्सोस इंडियाचे एक अधिकारी पारिजात चक्रवर्ती यांनी सांगितले की, सैन्य सर्वाधिक समर्पित कार्य करत असल्याचे समजले जाते. जे बलिदान, प्रतिबद्धता आणि अनुशासनचे मुल्य दर्शवते.

चक्रवर्ती यांनी सांगितले की, वैज्ञानिक आणि शिक्षकांना देखील एक चांगले प्रोफेशन समजले जाते. ते देखील देशाचे निर्माण करण्यासाठी योगदान देतात.

जागतिक स्तरावर, लोकांनी वैज्ञानिक (60 टक्के), डॉक्टर (56 टक्के) आणि शिक्षक (52 टक्के) विश्वासार्ह्य असल्याचे म्हटले आहे. जागतिक स्तरावर राजकीय नेते (67 टक्के), सरकारचे मंत्री (57 टक्के), जाहिरात अधिकारी (46 टक्के) यांना विश्वासार्ह्य नसल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणामध्ये 16 ते 74 वयोगटातील 19,587 सदस्यांनी भाग घेतला होता.

 

Leave a Comment