25 वर्ष भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या टाटा सुमोला निरोप


भारतीय रस्त्यांवर गेली 25 वर्ष राज्य करणाऱ्या टाटा मोटर्सच्या सुमोचे उत्पादन कंपनीने बंद केले आहे. भारतातील एखादीच अशी एसयुव्ही असेल जी एवढी लोकप्रिय झाली असेल. मोठ्या शहरांपासून ते गावापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही गाडी लोकप्रिय होती.

(Source)

टाटा मोटर्सने सुमोची विक्री कायमस्वरूपी बंद केली आहे. टाटाने 1994 मध्ये सर्वात प्रथम सुमो भारतात लाँच केली होती. मागील 25 वर्ष लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एसयुव्हीमध्ये अनेकदा बदल करण्यात आले. मात्र अनेकदा बदल करून देखील सुमो आजच्या काळातील हायटेक एसयुव्हींना टक्कर देऊ न शकल्याने मागे पडली.

(Source)

पुढील वर्षीपासून कंपनी भारतात कोणत्याही BSIV वाहनाची विक्री करू शकणार नाही. सुमोला BS6 मध्ये अपग्रेड करण्याविषयी अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. यामुळे कंपनी सुमोचे उत्पादन बंद करण्याची शक्यता आहे. टाटा डिलरशिप्सकडे देखील सुमो सध्या दिसत नाही. टाटा मोटर्स कंपनी भारतात सफारी स्ट्रोम, हेक्सा आणि कॉम्पॅक्ट एसयुव्ही या गाड्यांची विक्री करते.

Leave a Comment