टाटाच्या या एसयुव्हीवर मिळत आहे लाखोंची सुट


देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने आपल्या अनेक कारवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिले आहे. मंदीमुळे कारची विक्री होत नसल्याने, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्सने डिस्काउंट देण्यास सुरूवात केली आहे. जर तुम्ही टाटा हेक्सा ही एसयुव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

ऑफरबद्दल सांगायचे तर टाटा हेक्सावर एकूण 1.5 लाख रूपयांची सुट मिळते. यामध्ये 50 हजारांपर्यंत कॅश ऑफर, 35 हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफर, 15 हजार रूपये कॉर्पोरेट ऑफर आणि ठराविक चेसिसवर 50 हजारापर्यंतची बचत होऊ शकते.

(Source)
हेक्सामध्ये 2.2 लिटरचे 4 सिलेंडर असणारे VARICOR 320 डिझेल इंजिन देण्यात आले आहे जे 4000 Rpm वर 150 Ps ची पॉवर आणि 1500-3000 Rpm वर 320 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे 2179 सीसी डिझेल BSIV इंजिन देम्यात आले आहे. जे 4 हजार Rpm वर 114.73 Ps पॉवर आणि 1750-2500 Rpm वर 400 Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मेन्युअल, 6 स्पीड मेन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमेटिक गियरबॉक्स ऑप्शन मिळतो.

(Source)
या एसयुव्हीमध्ये 63 लीटरची क्षमता असलेला फ्यूल टँक देण्यात आला आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर टाटा हेक्साची एक्स शोरूम किंमत 13,25,266 ते 18,82,819 रूपयांपर्यंत आहे.

Leave a Comment