सॅमसंगने लाँच केला दमदार बॅटरीवाला स्मार्टफोन


सॅमसंग कंपनीने एम सीरिजमधील लेटेस्ट स्मार्टफोन गॅलेक्सी M30s आणि गॅलेक्सी M10s भारतात लाँच केले आहेत. गॅलेक्सी M30s स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात तब्बल 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याचबरोबर सुपर एमोलेड डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा देखील यात मिळेल.

(Source)

सॅमसंग गॅलेक्सी M30s चे फिचर्स –

गॅलेक्सी M30s मध्ये 6.4 इंच सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्ले देण्यात आला आहे. याचबरोबर यात 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 13,999 रूपये आहे. तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 16,999 रूपये आहे. यामध्ये ऑक्टाकोर एक्सीनोस 9611 प्रोसेसर असून, अँड्राइड 9 पाय ओएस देण्यात आले आहे.

कॅमेऱ्याविषयी सांगायचे तर यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात 48MP प्रायमेरी कॅमेरा, 5MP डेप्थ सेंसर कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

(Source)

सॅमसंग गॅलेक्सी M10s चे फिचर्स –

10 हजारांपेक्षा कमी किंमतीत येणारा सॅमसंगचा हा पहिला सुपर एमोलेड डिस्प्ले असणारा स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.4 इंच एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचबरोबर एक्सीनोस 7884 प्रोसेसर आणि एंड्रॉयड 9 पायवर हा फोन कार्यरत असेल. यात 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे.

यात 13 मेगापिक्सल प्रायमेरी आणि 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइट एंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 8 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 8,999 रूपये आहे.