हिंदी थोपवणे स्विकार केले जाणार नाही – रजनीकांत


देशात सध्या अनेक ठिकाणी हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. 14 सप्टेंबरला हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपुर्ण देशाला समजेल अशी एक भाषा म्हणून हिंदी असायला हवी असे म्हटले होते. अमित शाह यांच्या या विधानावर अनेकांनी टीका केली. आता अभिनेता रजनीकांत यांनी देखील हिंदी कोणावरही थोपवू नये, असे म्हटले आहे.

रजनीकांत म्हणाले की, हिंदी कोणावर थोपवली जाऊ शकत नाही. केवळ तामिळनाडूच नाही तर इतर दक्षिणेकडील राज्य देखील हिंदी थोपवणे स्विकार करणार नाहीत. केवळ हिंदीच नाही तर कोणतीही भाषा थोपवली जाऊ नये. जर कोणतीही एकच भाषा असते तर देशाच्या एकतेसाठी आणि प्रगतीसाठी चांगले होते, मात्र भाषा कोणावरही जबरदस्तीने थोपवणे हे स्विकार केले जाणार नाही.

अभिनेता कमल हसन यांनी देखील अमित शाह यांच्या या विधानावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, आणखी एक भाषेचे आंदोलन होईल, जे जलीकट्टू पेक्षाही अधिक मोठे असेल. भारत 1950 मध्ये लोकांना त्यांची भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करेल असे वचन देऊनच प्रजासत्ताक बनला होता. कोणीही शाह, सुल्तान अथवा सम्राट अचानक येऊन हे वचन तोडू शकत नाही.

Leave a Comment