व्हायरल, एक विवाह सोहळा असा देखील


लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात लग्नाची गाठ बांधण्यासाठी वर-वधू देखील योग्य जागेची निवड करतात. एकदाच होणारे लग्न अविस्मरणीय करण्याचा प्रत्यकेचा मानस असतो. जर्मनीतील असेच एका हटक्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हाय-वायर आर्टिस्ट (दोरीवरून चालणारे कलाकार) असलेल्या 33 वर्षीय एना ट्रबरने देखील असाच विवाह अविस्मरणीय केला आहे.

High-wire wedding: The tightrope artist Anna Traber (33) has married meters high above the market square of her hometown…

Posted by CCTV on Monday, September 16, 2019

अँनाने जमीनीपासून कितीतरी फूट उंचावर दोरीला बांधलेल्या झोपाळ्यात बसून विवाह केला आहे. एनाने स्वेन ल्येर याच्याशी विवाह केला आहे. एना व स्वेनचा विवाह जर्मनीतील ब्रसॅच येथे झाला. यावेळी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती.

(Source)

एना आणि स्वनेच्या या हटके विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर देखील युजर्स या नुकत्याच लग्न झालेल्या कपलला शुभेच्छा देत आहेत.

(Source)

एना म्हणाली की, प्रत्येक विवाह हा एक प्रकारे टाइटरोपवरून चालण्यासारखाच असतो. आमच्या विवाहासाठी टाइटरोप एक चांगली सुरूवात आहे.

(Source)

एका युजर्सने लिहिले की, हा विवाह एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे की, हाच एक चित्रपट आहे ?

Leave a Comment