आयआरसीटीसीवर असे बुक करा तात्काळ तिकीट


आयआरसीटीसी अ‍ॅप अथवा वेबसाइटवर कंफर्म तत्काळ तिकीट बुक करणे नेहमीच अवघड असतो. जोपर्यंत तुम्ही प्रवासाची माहिती भरत असता, तेवढ्या वेळेत सर्व तिकीट बुक होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तत्काळ तिकीट बुक करताना अडचण येणार नाही. मात्र यासाठी तुमच्याकडे हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ – तत्काळ तिकीट बुक करण्याआधी तुम्हाला त्याची वेळ माहिती असणे गरजेचे आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइट अथवा अ‍ॅप तत्काळ तिकीट प्रवासाच्या केवळ एकदिवस आधी बुक करता येते. जर तुम्हाला एसी क्लास (फर्स्ट एसी, सेकेंड एसी, थ्री टियर एसी) चे तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही सकाळी 10 वाजता वेबसाइट अथवा अ‍ॅपवर लॉग इन करून तत्काळ तिकीट बुक करू शकता. एका पीएनआर नंबरवर जास्तीत जास्त 4 प्रवाशांचे तिकीट बुक होऊ शकते.

आधीच भरून ठेवा सर्व माहिती – तत्काळ तिकीट बुक करण्याआधी प्रवाशांचे नाव, वय, लिंग इत्यादी गोष्टी आधीच सेव्ह करून ठेवा. जेणेकरून विंडो ओपन होताच त्वरित माहिती भरता येईल. आयआरसीटीसीच्या वेबसाइट अथवा अ‍ॅपबरोबर तुम्ही तुमच्या अकाउंटची मास्टर लिस्ट देखील तयार करू शकता.

मास्टर लिस्ट – मास्टर लिस्टच्या मदतीने प्रवाशांची माहिती भरण्याच्या वेळेत बचत होते. मास्टर लिस्ट तयार करण्यासाठी प्रवाशाचे नाव, वय, लिंग आणि आयडी प्रुफची माहिती देणे गरजेचे असते. कुटुंबाची माहिती देखील मास्टर लिस्टमध्ये सेव्ह करता येते.

पेमेंट ऑप्शन – जर तुम्ही ऑनलाइन तिकीट काढत असाल तर यासाठी मोबाईल वॉलेट, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि युपीआयद्वारे देखील पेमेंट करू शकता.  तुम्ही वारंवार वेबसाइट अथवा अ‍ॅपचा वापर करत असाल तर आधीच पेमेंटची माहिती सेव्ह करू शकता. जेणेकरून पेमेंट करण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही.

Leave a Comment