आयकर विभागाचे आवाहन, सोशल मीडियावर शेअर करु नका पॅनकार्ड


आयकर विभागाने सर्व पर्मेनंट अकाउंट नंबर (पॅन) धारकांना पॅनकार्डची माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याची सूचना दिली आहे. विभागाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर खाजगी माहिती शेअर केल्याने त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो.

अनेकजण आयटीआर रिफंड आणि इनकम टॅक्स सारख्या विषयांवर चर्चा करताना, माहिती देताना सोशल मीडियावर पॅनकार्डची माहिती, फोटो शेअर करतात. अशा सर्व युजरला आयकर विभागाने सोशल मीडियावर खाजगी माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.


खाजगी माहिती सोशल मीडियावर शेअर केल्याने त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो. पॅनप्रमाणेच यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) देखील आधार कार्डची माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याची सुचना दिली आहे.

आयकर संबंधित माहितीसाठी करदाता ऑनलाइन फॉर्मभरून आयकर विभागाला स्वतःचे प्रश्न विचारू शकतो. वरील ट्विटमध्ये आयकर विभागाने फॉर्मची लिंक दिली आहे.

Leave a Comment