लवकरच येणार Googleचे ‘स्मार्ट स्क्रीनशॉट’ सर्च


गुगलवर आतापर्यंत आपण एखादे अक्षर टाईप करुन सर्च करत होती पण आता लवकरच गुगलवर लवकरच स्क्रीनशॉटद्वारे इमेज शोधता येणे शक्य होणार आहे. सध्या गुगलकडून या फीचरची चाचणी सुरू असल्याचे वृत्त असून युजरने याद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून स्क्रीनशॉट घेतल्यास गुगल सर्च हा पर्याय त्याला दर्शवला जाईल. या संदर्भातील सविस्तर वृत्त 9to5 google या टेक पोर्टलने दिले आहे.

‘स्मार्ट स्क्रीनशॉट्स’ नावाचा एक नवा पर्याय गुगल अॅपच्या नव्या अपडेटमध्ये म्हणजेच 10.61 व्हर्जनमध्ये असेल. युजरला याद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून स्क्रीनशॉट घेतल्यास गुगल सर्च हा पर्यायदेखील त्याला दर्शविण्यात येईल. यावर क्लिक केल्यास त्या स्क्रीनशॉटशी संबंधित माहिती सर्च करता येईल, असे सांगण्यात येत आहे. पण, हे फीचर नेमके कशाप्रकारे काम करेल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. हे फीचर अजून प्रयोगात्मक अवस्थेत असून सध्या फीचरला निवडक युजर्ससाठीच सादर करण्यात आले आहे, अपडेटनंतर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येण्याची शक्यता असल्याचे या टेक पोर्टलने आपल्या वृत्तात नमूद केले आहे. यापूर्वीच इमेजच्या सहाय्याने सर्च करण्यासाठी गुगलने रिव्हर्स इमेज सर्च ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता स्क्रीनशॉटच्या मदतीने सर्चचे फीचर आल्यास युजर्ससाठी ते खूप सोयीस्कर होणार आहे.

Leave a Comment