फेसबुकने हटवल्या तब्बल 2.60 करोड आक्षेपार्ह पोस्ट


सोशल मीडिया कंपनी फेसबुकने 2 वर्षात दहशतवादी संघटनांच्या 2.60 करोड पोस्ट हटवल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक आयएसआयएस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांच्या पोस्ट होत्या. कंपनीने आतापर्यंत 200 पेक्षा अधिक हिंसक पोस्ट हटवल्या असून, दहशतवादाला खतपाणी घालणारे ग्रुप्स देखील बंद केले आहेत.

फेसबुकने म्हटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मानव विशेषतज्ञाची मदत घेऊन दहशतवादा संबंधित पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. कंपनीने न्युझीलँडच्या क्राइस्टचर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देखील अशा पोस्ट डिलीट केल्या होत्या. कंपनीने अशा हिंसक पोस्टवर रोख लावण्यासाठी नवीन नियम देखील लागू केले आहेत.

फेसबुक टेक कंपनी गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरबरोबर मिळून 9 प्वाइंट्स इंड्स्ट्री प्लॅनवर काम करत आहे. कंपनी या प्लॅनद्वारे दहशतवाद्यांसंबंधित पोस्ट कशा शेअर केल्या जातात याची माहिती मिळवेल. तसेच, फेसबुकने म्हटले आहे की, हिंसक पोस्टवर लगाम घालण्यासाठी आम्ही नियमांमध्ये वारंवार बदल करत आहोत.

Leave a Comment