फेसबुकच्या या फिचरचा इंस्टाग्रामवरही करता येणार वापर


फेसबुकने भारतीय युजर्ससाठी खास फिचर लाँच केले आहे. आता भारतीय युजर्स फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईलच्या स्टोरीजमध्ये म्यूजिक टाकू शकणार आहेत. आतापर्यंत स्टोरीज सेक्शनमध्ये केवळ फोटो आणि व्हिडीओज 24 तासांसाठी टाकता येत होते.

फेसबुकने म्हटले की, आम्ही भारतीय युजर्सला स्वतःच्या भावना संगीताद्वारे व्यक्त करण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म देत आहोत. आता ते स्टोरिजमध्ये म्यूजिक स्टिकर्स आणि फेसबुक प्रोफाईलमध्ये गाण्याचे लिरिक्स, लिप सिंक लाईव्ह आणि आवडीचे गाणे पोस्ट शकतात. याचबरोबर फेसबुकवर म्युझिकची सेवा वापरू शकणारा भारत हा 55 वा देश बनला आहे.

फेसबुकने म्युझिकचा वापर करण्यासाठी टी-सीरिज, झी म्युझिक कंपनी आणि यशराज फिल्मसबरोबर भागिदारी देखील केली आहे.

असा करा नवीन फिचरचा वापर – युजर्सला या फिचरचा वापर करण्यासाठी फेसबुक अथवा इंस्टाग्रामवर जाऊन कॅमेरा ओपन करावा लागेल किंवा कोणताही एक फोटो, व्हिडीओ मोबाईलमधून निवडावा लागेल. त्यानंतर त्यात म्युझिक स्टिकर अ‍ॅड करावे लागेल. म्युझिक स्टिकरद्वारे युजर्स त्यांना हवे ते गाणे व गाण्यातील भाग पोस्ट करू शकतील. टिकटॉक अ‍ॅपप्रमाणेच लिप सिंक लाईव्ह फिचर देखील फेसबुक युजर्सला वापरता येणार आहे.

Leave a Comment