समुद्रात सापडला ‘डायनोसॉर मासा’, फोटो व्हायरल


नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या एका विचित्र माशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दुर्मिळ माशाचे शेपूट आणि डोळे खूपच मोठे आहेत. 19 वर्षीय ऑस्कर नावाच्या गाइडने हा मासा समुद्रातून पकडला आहे. नॉर्डिंगच्या एंगालिंग कंपनीने या गाइडला समुद्रात फिशिंग करण्यासाठी पाठवले होते. तेव्हा त्याला हा दुर्मिळ मासा सापडला.

हा गाइड ब्लू हॅबिलिट माशांच्या शोधात असताना नॉर्वेच्या एन्डोया द्वीपवर हा एलियन मासा सापडला. ऑस्करने सांगितले की, आम्ही समुद्रात चार हुक्स टाकले होते. 30 मिनिटांच्या आतच हा मासा हुकमध्ये अडकला. हा मासा थोडाफार डायनॉसोरप्रमाणे दिसतो. असा मासा आजपर्यंत कधीच बघितला नाही.

हा मासा एक रॅटफिश आहे, ज्याचे 300 मिलियन वर्षांपुर्वी शार्कबरोबर संबंध होते. याचे लॅटिन नाव कामेरस मोनस्ट्रोसा लिनेअस (Chimaeras Monstrosa Linnaeus) आहे. या माशाचे वैशिष्ट्य त्याचे सिंहासारखे डोळे आणि ड्रॅगन सारखे शेपूट आहे.

रॅटफिश  खोल पाण्यात आढळतात. आपल्या मोठ्या डोळ्यांमुळे हे मासे समुद्रात अंधारात देखील खोलवर जातात.

Leave a Comment