2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन बनवण्याचे उद्दिष्ट –  राजनाथ सिंग


केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिष्टं असल्याचे म्हटले आहे. यामध्ये डिफेंस सेक्टरचे महत्त्वपुर्ण योगदान असेल. मेक इंडिया अंतर्गत संरक्षण विभागाला प्रमुख क्षेत्रांपैकी एक बनवले जाईल, असेही ते म्हणाले. सोसाइटी ऑफ इंडियन डिफेंस मेन्युफेक्चर्सच्या दुसऱ्या वार्षिक सत्रात ते बोलत होते.

राजनाथ सिंग म्हणाले की, भारतीय संरक्षण उद्योग याआधी आपल्या पुर्णक्षमतेचा वापर करू शकलेला नाही. यामुळे आपल्याला आयात हत्यारांवर निर्भर राहावे लागते. या कार्यक्रमाची थीम ‘मेक इन इंडिया: 2025 पर्यंत 26 अब्ज डॉलरच्या संरक्षण उद्योगाकडे अग्रेसर’ ही होती.

ते म्हणाले की, भारताची सध्या अर्थव्यवस्था 2.7 ट्रिलियन डॉलर आहे. 2024 पर्यंत आपला देश पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत पोहचेल आणि 2030 पर्यंत आपली अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलर बनवण्याचे उदिष्टं आहे.

भारत संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असून, भारत केवळ हत्यार निर्माण करणारा नाही तर निर्यात करणारा देश देखील असेल, असे ते म्हणाले.

 

Leave a Comment