या जुगाऱ्याने घातलेल्या घड्याळाच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते घर आणि कार


अमेरिकन पोकर प्लेयर आणि प्लेबॉय मिलियनेयर डेन बिल्जेरियन आपल्या शानदार लाईफ स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतो. डेन बिल्जेरियन एका प्रोडक्ट लाँचसाठी भारतात आला होता. तो भारतातील सर्वात मोठा पोकर इव्हेंट इंडिया पोकर चॅम्पियनशीपमध्ये देखील उपस्थित होता.

मात्र डेन बिल्जेरियन पेक्षा सध्या त्याच्या घड्याळाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्याने एवढे महाग घड्याळ घातले होते की, त्यामध्ये भारतात एक घर आणि कार येऊ शकेल. सोशल मीडियावर त्याच्या घड्याळाची जोरदार चर्चा सुरू आहे.

डेन बिल्जेरियनने घातलेल्या घड्याळाचे नाव Richard Mille RM11-03 आहे. या घड्याळाची किंमत 191,500 डॉलर (1.36 करोड रुपये) आहे. हे घड्याळ मागील वर्षी जिनिव्हा इंटरनॅशल मोटार शोमध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीने यासारखी केवळ 500 घड्याळं बनवली आहेत. मॅक्लरेनच्या गाडीच्या डिझाइनपासून प्रेरणा घेऊन हे घड्याळ बनवण्यात आले असून, या घड्याळाला टायटॅनियम पुशर्स आणि ग्रेड 5 टायटॅनियम क्राऊन आहे, ते मॅक्लरेनच्या व्हिलप्रमाणे दिसते.

View this post on Instagram

Don’t take yourself too seriously

A post shared by Dan Bilzerian (@danbilzerian) on

View this post on Instagram

Icelandic journeys 🌋🍄

A post shared by Dan Bilzerian (@danbilzerian) on

डेन बिल्जेरियन हा ‘किंग ऑफ इंस्टाग्राम’ म्हणून ओळखला जातो. इंस्टाग्रामवरील आपल्या पोस्टमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. तो 150 मिलियन डॉलरचा मालक आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील जन्म झालेल्या डेनचा भाऊ एडम बिल्जेरियन हा देखील पोकर प्लेयर आहे.

View this post on Instagram

Sometimes u gotta grab a good one and run

A post shared by Dan Bilzerian (@danbilzerian) on

डेनने 2000 मध्ये नौदलात भरती होण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देखील भाग घेतला होता. मात्र त्यात त्याला अपयश आले. त्यानंतर त्याने युनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडामधून बिझनेस आणि क्रिमिनोलॉजीची पदवी घेतली.

View this post on Instagram

🍄🌞

A post shared by Dan Bilzerian (@danbilzerian) on

ऑलंपस हॅज फॉलन (2013), द इक्वीलायझर (2014) या चित्रपटांमध्ये देखील डेनने काम केलेले आहे.

Leave a Comment