भारतीय रेल्वे होणार ‘नॉइसलेस’


भारतीय रेल्वेने ट्रेनचे संचालन पॉवर कारच्या जागी ओव्हरहेड विद्युत प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. पॉवर कार काढल्याने रेल्वेचा होणारा आवाज देखील बंद होईल. यामुळे नवीन सीट आणि दिव्यांगासाठी आरक्षित सीट देखील मिळतील.  याचबरोबर प्रत्येक रेल्वेमधील दोन जनरेटर कोचपैकी एक काढले जाईल.

दोन पॉवर कार पैकी एकाला एलएसएलआरडी (एलएचबी सेकेंड लगेज, गार्ड आणि दिव्यांग कंपार्टमेंट) मध्ये बदलण्यात येईल. यामध्ये दिव्यांगासाठी 6 सीट आरक्षित असतील. तसेच प्रवाशांना नवीन 30 सीट आणि सामान ठेवण्यासाठी अतिरिक्त जागा देखील मिळेल.

सद्यस्थितीत वापरण्यात येणारे पॉवर कार 105 डेसिबल आवाज उत्पन्न करते. मात्र वर्षाच्या अखेरपर्यंत ते शुन्यावर जाईल. तसेच यामुळे एका वर्षात वीजेच्या बिलात तब्बल 800 करोड रूपयांची बचत देखील होईल आणि ध्वनी प्रदुषण देखील कमी होईल. नवीन वापरल्या जाणाऱ्या विद्युत प्रणालीला ‘हेड ऑन जनरेशन’ म्हटले जाते.

Leave a Comment