या महिलेने 54 तासात 4 वेळा पार केली इंग्लिश खाडी


अमेरिकेच्या कोलोराडो येथील सारा थॉमसने 54 तासात 4 वेळा इंग्लिश चॅनेल (खाडी) पोहून पार करण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी  करणारी ती पहिलीच महिला आहे. तिने 54 तासात न थांबता 215 किलोमीटर अंतर पुर्ण केले. साराने मंगळवारी सकाळी 6.30 वाजता डोवर येथे चौथी फेरी पुर्ण केली. 37 वर्षीय साराला ब्रेस्ट कॅन्सर देखील झाला होता, मात्र तिने त्याच्यावरही मात केली आहे.

215 किलोमीटरचे अंतर पुर्ण केल्यावर सारा म्हणाली की, मी स्तब्ध झाले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. साराने सांगितले की, पोहताना तिला अनेकदा जेलीफिशचा सामना करावा लागला. मात्र आता मला विश्वास होत नाहीये की, मी हे करून दाखवले. 54 तासांच्या दरम्यान तिने इलेक्ट्रोल आणि कॅफीन युक्त द्रव पदार्थांचे सेवन केले.

साराचा पोहतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये  जमलेली लोक साराचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. समर्थकांनी साराला शँपेंन आणि चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या. साराने सांगितले की, समुद्राच्या खारट पाण्यामुळे तिच्या गळ्या, जीभेला आणि चेहऱ्याला नुकसान झाले आहे. साराने फेसबुक पोस्ट लिहित,  हा रेकॉर्ड कॅन्सर पिडितांना समर्पित केला आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली.

Leave a Comment