हेल्मेट न घालताही या चालकाला दंड नाही


सप्टेंबरमध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन वाहन नियम कायद्यामुळे दररोज कुठे, कुणाला, किती दंड आकाराला गेला याच्या बातम्या येत आहेत. गुजराथ मध्ये मात्र एका बाईकस्वाराला त्याने हेल्मेट घातलेले नसले तरी दंड होत नसल्याचे समजते. या बाईकचालकाने वाहतूक पोलिसांसमोर नवीनच समस्या निर्माण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुजराथच्या छोटा उदेपूरमधील बोडोली भागात सोमवारी विना हेल्मेट बाईक चालविणाऱ्या जाकीर मेमन यांना दंड केला गेला नाही. अर्थात जाकीर यांनी हेल्मेट घातले नसल्याने पोलिसांनी त्यांना अडविले जरूर पण जाकीर याची अडचण ऐकल्यावर त्यांना दंड न करता सोडले गेले. जाकीर यांनी सांगितले त्याचे डोके सामान्य माणसाच्या डोक्याच्या आकारापेक्षा मोठे आहे. शहरातील अनेक हेल्मेट दुकाने पालथी घालूनही त्यांच्या डोक्याच्या मापाचे हेल्मेट मिळत नाही.

झाकीर याच्याकडे गाडीची सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत शिवाय त्यांची या परिसरात सज्जन आणि कायदा पाळणारा माणूस अशी ओळख आहे. जाकीर यांचे म्हणणे असे की त्यानाही हेल्मेट घालायचे आहे, नियम पाळायचा आहे. पण मापाचे हेल्मेट मिळत नाही त्याला काय करू? हेल्मेट घातले नाही म्हणून किती वेळा दंड भरू?

वाहतूक विभागाचे उपअधीक्षक वसंत राठवा यांनी जाकीर याची समस्या खरी असल्याचे सांगितले आणि या अडचणीवर आमच्याकडे काही उपाय नाही म्हणून त्यांना दंड न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Leave a Comment