बेन स्टोक्स ‘द सन’ वर भडकला


इंग्लंडला प्रथमच विश्वकप जिंकून देण्यात महत्वाचे योगदान दिलेला आणि नुकत्याच पार पडलेल्या अशेस मालिकेत आपल्या फलंदाजीचे उत्तम प्रदर्शन करून इंग्लंडला विजयी बनविणारा फलंदाज बेन स्टोक्स याने त्याच्या खासगी आयुष्यात डोकावून एक दुर्देवी सत्य जगासमोर आणणाऱ्या ‘द सन’ या लोकप्रिय वृत्तपत्रावर ट्विटरवरून सडकून टीका केली आहे. आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यात बेन याने या घटनेचा कधीच उच्चार केला नव्हता.

द सनच्या वार्ताहराने दिलेल्या बातमीनुसार बेनच्या सावत्र भाऊ आणि बहिणीची सावत्र वडिलांनी हत्त्या करून स्वतः आत्महत्या केली होती. अर्थात ही घटना दुर्देवी आहेच पण ती बेनच्या जन्माआधी घडलेली आहे. बेनचा जन्म १९८८ सालचा. त्याची आई डेब हिने दोन विवाह केले होते. पहिले पती रिचर्ड याच्यापासून तिला दोन मुले झाली. मात्र हा विवाह फारकाळ टिकला नाही आणि त्याच्या घटस्फोट झाला. मात्र मुलगी ट्रेसी आणि मुलगा अँन्द्र्यू यांची विकेंड कस्टडी वडिलांकडे होती. डेब आणि बेनचे वडील गेरार्ड स्टोक यांच्यात जवळीक वाढली तेव्हा रिचर्डने या दोन्ही मुलांना गोळी घालून ठार केले आणि स्वतःलाही गोळी मारून आत्महत्या केली होती.

द.सनच्या वार्ताहराने बेनच्या न्यूझीलंड येथील घरी जाऊन ही माहिती काढली आणि ती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली तेव्हा बेन व्यथित झाला. त्याने ट्विटरवरून द. सनची निर्भत्सना केली. तो म्हणतो, माझे नाव वापरून माझ्या खासगी आयुष्यात तसेच माझ्या आईवडिलांच्या खासगी जीवनात तुम्ही घुसखोरी केली आहे. हे करायच्या अधिकार मी कुणालाच दिलेला नाही. माझ्या प्रोफाईलवरून आई वडील, माझी पत्नी, मुले आणि अन्य कुटुंबीय याच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचे पत्रकारितेचे हे सर्वात गलिच्छ रूप आहे. तुम्ही हे सारे फक्त पैशासाठी करत आहात, दुसऱ्याच्या आयुष्याशी तुम्हाला काही देणे घेणे नही.

Leave a Comment