क्रिकेट सट्टा कायदेशीर होण्याची शक्यता


भारतीय क्रिकेट क्षेत्रातील भ्रष्टाचारावर लगाम लागावा यासाठी बीसीसीआयने नेमलेल्या भ्रष्टाचार नियंत्रण युनिटचे प्रमुख अजितसिंह शेखावत यांनी इंग्लंड ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतात बेटिंगला कायदेशीर मान्यता द्यावी असे सुचविले आहे. राजस्थानचे माजी पोलीस महासंचालक म्हणून अजितसिंग शेखावत यांनी जबाबदारी पार पाडली आहे. बीसीसीआयने बेटिंग कायदेशीर करण्यासाठी आवश्यक ते नियम बदलावेत असे मत व्यक्त करताना ते म्हणाले. एकदा मॅच फिक्सिंग संदर्भात कायदा बनला तर पोलिसांना त्याची भूमिका स्पष्ट करणे शक्य होणार आहे.

तामिळनाडू प्रीमियम लीग आणि भारतीय महिला क्रिकेट मध्ये मॅच फिक्सिंग झाल्याची तथाकथित प्रकरणे नुकतीच उघड झाली असून त्याचा तपास बीसीसीआयने भ्रष्टाचार नियंत्रण समितीकडे सोपविला आहे. यावेळी अजितसिंह बोलत होते. ते म्हणाले, सट्टेबाजी कायदेशीर करणे हा भ्रष्टाचार रोखण्याचा एक मार्ग आहे. त्यासाठी काही नियम बनविले जावेत. त्यातून सरकारला महसूल मिळेल शिवाय बेटिंग कोण करते, किती रकमेचे बेटिंग होते याची माहिती उपलब्ध होईल. त्यातून डेटा जमा होईल आणि त्यामुळे बेकायदा सट्टेबाजी करणे अवघड बनेल.

अजितसिंह म्हणाले सध्या बेटिंग करताना पकडले गेले तर १०० किंवा १००० रु. दंड केला जातो. सुप्रीम कोर्टाने २०१५ मध्ये बीसीसीआयला नियमात बदल करून स्पॉट फिक्सिंग कायदेशीर केले जावे असे सांगितले होते. २०१३ मध्ये बीसीसीआयने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चौकशीसाठी लोढा कमिटी स्थापन केली होती त्यानीही बेटिंगला कायेदेशीर मान्यता दिली जावी असा अहवाल दिला होता.

Leave a Comment