गिनीज बुकमध्ये नोंदला गेलेला रग्बी बॉल बनविला भारतीयाने


इंग्लंडच्या मॉल्टन सेंट्रल पार्कमध्ये एका रग्बी बॉलने जगातील सर्वात मोठा रग्बी बॉल म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले असून १५ सप्टेंबरपासून हा बॉल सोशल मिडिया आणि विशेष म्हणजे भारतात बराच चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे हा बॉल जालंधरच्या क्रीडा साहित्य उद्योगात असलेल्या कुटुंबाने तयार केला आहे.

क्रीडा साहित्य उद्योगात असलेल्या पंजाबच्या महाजन परिवाराचा एक कारखाना इंग्लंड मध्ये आहे तर दुसरा जालंदर मध्ये आहे. जालंदरमधील उषा इंटरनॅशनलची जबाबदारी अजय महाजन पाहतात तर इंग्लंडमधील या परिवाराच्या एरामीस रग्बी कंपनीची जबाबदारी त्यांचे बंधू सांभाळतात. अजय नुकतेच इंग्लंडला गेले होते तेव्हा ५ पॉइंट ९.८ मीटर लांबीचा बॉल तयार केला गेला. या बॉलचा व्यास ३.७ मीटर आहे. हा बॉल उचलून योग्य जागी नेण्यासाठी हेलीकॉप्टरचा वापर करावा लागला. यापूर्वीचा सर्वात मोठा रग्बी बॉल ४ पॉइंट ७ मीटर या आकाराचा होता.

Leave a Comment