कात टाकणार वाय-फाय, मिळणार अनेक नवीन बदल


Wi-Fi Alliance ने Wi-Fi Certified 6 या टेक्नोलॉजीची घोषणा केली आहे. या न्यू जनरेशन वायरलेस टेक्नोलॉजीच्या वापर नवीन येणाऱ्या वायफाय डिव्हाईसमध्ये केला जाणार आहे. या नवीन टेक्नोलॉजीसाठी सॅमसंग, शाओमी, क्वॉलक्कम, ब्रॉडक्वॉम सारख्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. वाय-फाय डिव्हाईस बनवणाऱ्या कंपन्या देखील वाय-फाय 6 टेक्नोलॉजीमध्ये रस दाखवतील.

वाय-फाय 6 टेक्नोलॉजीमध्ये युजर्सला मागील वाय-फाये टेक्नोलॉजीपेक्षा 40 टक्के अधिक स्पीडने इंटरनेट एक्सेस मिळेल. या नवीन टेक्नोलॉजीला युजर फ्रेंडली बनवण्यासाठी याचे नाव वाय-फाय 6 ठेवण्यात आलेले आहे. नवीन तंत्रज्ञानामध्ये अनेक हार्डवेअर बदल करण्यात आले आहेत, जे या डिव्हाईसला अधिक कॉम्पिटेबल बनवते.

वाय-फाय 6 टेक्नोलॉजीचा वापर केल्याने डिव्हाईसला अधिक चांगली बॅटरी लाईफ देखील मिळेल. 2020 मध्ये लाँच होणाऱ्या डिव्हाईसमध्ये या टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. गर्दीच्या ठिकाणी देखील चांगली नेटवर्क कनेक्टिविटी देखील यामध्ये मिळेल. दावा करण्यात येत आहे की, वाय-फाय 6 मुळे आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या टेक्नोलॉजी पेक्षा 4 पट अधिक स्पीडमध्ये इंटरनेट कनेक्टिविटी उपलब्ध होईल.

Leave a Comment