विवोचा जबरदस्त कॅमेरावाला 5 जी स्मार्टफोन लाँच


विवोने नेक्स 3 आणि नेक्स 3 5जी हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. चीनमध्ये या स्मार्टफोन्सची विक्री 21 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर पुढील महिन्यात इतर देशांमध्ये हा फोन लाँच केला जाणार आहे.

या फोनमध्ये बाजूला प्रेशर-सेंसेटिव्ह बटन्स देण्यात आले आहे. ज्याद्वारे युनिक वायब्रेटिंग एक्सपेरियंस मिळतो. यामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर आणि 44W अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4500 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

(Source)

विवो नेक्स 3 च्या 8 जीबी+128 जीबी व्हेरिएंटची किंमत 4,998 युआन (जवळपास 50 हजार रूपये) आहे. तर नेक्स 3 5जी 8 जीबी +256 जीबी व्हेरिएंटची किंमत 5,698 युआन आणि 12 जीबी +256 जीबी व्हेरिएंटची किंमत 6,198 युआन आहे.

या दोन्ही फोनमध्ये अँड्राइड पाय Funtouch OS 9.1 देण्यात आले आहे. तसेच, यामध्ये 6.89 इंच फुल एचडी+ AMOLED नॉच-लेस वॉटरफॉल डिस्प्ले, Adreno 640 GPU बरोबर 2.96GHz ऑक्टा-कोर स्नैपड्रॅगन 855+ प्रोसेसर देण्यात आला आहे.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला असून, यामध्ये 64 मेगापिक्सल सॅमसंग GW1 सेंसर, 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड एंगल सेंसर आणि  10x डिजिटलबरोबर 13 मेगापिक्सल टेलिफोटो सेंसरचा समावेश आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

Leave a Comment