मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे पोस्टर रिलीज


पंतप्रधान मोदींच्या 69 व्या वाढदिवशी त्यांच्या आयुष्यावरील चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि प्रभास सारख्या कलाकारांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. मन बैरागी असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट महावीर जैन आणि संजय लीला भन्साळी निर्मित करीत आहेत. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले आहे. रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या शेवटी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

अक्षयकुमार यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले की, संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन यांच्या स्पेशल प्रोजेक्टचा फर्स्ट लूक लॉन्च करताना मला खूप आनंद झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी मन बैरागी चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले आहे


याशिवाय प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर – एका खास दिवशी खास दिग्दर्शकाच्या एका खास व्यक्तीवर बनवलेला खास चित्रपट. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंतप्रधान मोदी सर. संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन यांच्या ‘मन बैरागी’ या चित्रपटाचा पहिला लूक सादर करताना खूप आनंद झाला. संजय त्रिपाठी दिग्दर्शित पंतप्रधान मोदींची ही न ऐकलेली कहाणी आहे.


उल्लेखनीय आहे की काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विवेक ओबेरॉय यांनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. हा चित्रपट केवळ 23 कोटी कमावू शकला होता.

Leave a Comment