ऑक्सफर्ड सर्वेक्षण; दर पाचवा व्यक्ती वापरत नाही इंटरनेट


ऑक्सफर्ड इंटरनेट इंस्टीट्युटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये दावा करण्यात आला आहे की, ब्रिटनमधील दर पाचवा व्यक्ती आजही इंटरनेटचा वापर करत नाही. यामध्ये अनेक लोक हे वृध्द आणि कमी वयाचे आहेत. सर्वेक्षणानुसार, इंटरनेटचा वापर करणारे लोक सांगतात की, ते स्वतःच्या इच्छेने इंटरनेटचा वापर करत नाही. कारण त्यांना त्यांची खाजगी माहिती लीक होण्याची भिती असते. याचबरोबर त्यांचे मित्र-मैत्रिणी आणि आवड ठरलेली असल्याने त्यांना इंटरनेटची गरज देखील भासत नाही.

या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या डॉ. ग्रांट ब्लांक यांनी सांगितले की, इंटरनेट अथवा कॉम्प्यूटरवर देखील इंटरनेटचा वापर न करणाऱ्या व्यक्तींचा यामध्ये सहभाग आहे. वयाच्या 50 वर्षांपर्यंत अधिकांश लोक ऑनलाइन असतात. मात्र 50 वर्षानंतर हे लोक इंटरनेटचा वापर कमी करतात. याचे प्रमाण दरवर्षी 2 टक्के आहे.

याचबरोबर इंटरनेटचा वापर बंद करणाऱ्यांना काही दिवसांपुर्वीच व्हायरस अटॅक आणि आर्थिक फटका देखील बसला आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या 70 टक्के लोकांनी जाहिराती आणि डाटा ट्रँकिंगला वैतागले असल्याचे सांगितले. याच बरोबर इंटरनेटचा वापर न करणाऱ्यांमध्ये ज्यांची वार्षिक कमाई 25 लाखांपेक्षा कमी आहे, अशा लोकांचे प्रमाण जास्त आहे. याचबरोबर 92 टक्के लोक इंटरनेटसाठी फोनचा वापर करतात.

Leave a Comment