पाकच्या ‘अनफीट’ पाक खेळाडूंवर बिर्याणीची संक्रांत


पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या मिस्बाह उल हकने संघाचा फिटनेस वाढावा यासाठी खेळाडूंना बिर्याणी आणि मिठाई खाण्यापासून सक्त मनाई केली आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानी चाहत्याने म्हटले होते की, सामन्याच्या आधी हे सर्व खेळाडू पिझ्झा आणि बर्गर खात होते, त्यामुळे फील्डवर त्यांच्यामध्ये चपळता दिसून येत नव्हती.

वर्ल्ड कप दरम्यान खेळाडूंच्या फिटनेसवर झालेल्या टीकेनंतर आता पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंना फिट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. मिस्बाहने राष्ट्रीय कँप आणि स्थानिक स्पर्धांमध्ये खेळाडूंचा डाइट बदलण्यास सांगितले आहे. ज्यामुळे संघात फिटनेसचे एक नवीन कल्चर सुरू होईल. त्याने खेळाडूंना बिर्याणी आणि मिठाई खाण्यास मनाई केली आहे.

मिस्बाह आणि वकार युनिस यांच्या मार्गदर्शनामध्ये पाकिस्तान पहिली मालिका श्रीलंकाबरोबर खेळणार आहे. पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबरच्या दरम्यान तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.

Leave a Comment