शाओमीचे चार नवीन स्मार्ट टिव्ही लाँच, एवढी आहे किंमत


चीनी कंपनी शाओमीने आज भारतीय बाजारात 4 नवीन एमआय स्मार्ट टिव्ही लाँच केले आहेत. यामध्ये 65 इंचच्या MI TV 4X फ्लॅगशिपचा देखील समावेश आहे. याचबरोबर MI TV 4X 40 इंच, 43 इंच आणि 50 इंच स्मार्ट टिव्ही देखील लाँच केले आहेत.

Mi TV 4X 65 इंच टिव्हीची किंमत 54,999 रूपये आहे. 50 इंच टिव्हीची किंमत 29,999 रूपये, 43 इंचची किंमत 24,999 आणि 40 इंच टिव्हीची किंमत 17,999 रूपये आहे.

Mi TV 4X 65 इंच स्मार्ट टिव्हीचे फिचर्स – शाओमी Mi TV 4X 65 इंच स्मार्ट टिव्हीमध्ये 4K डिस्प्लेबरोबर HDR10 सपोर्ट देखील देण्यात आला आहे. चांगल्या साउंड क्वालिटीसाठी डॉल्बी अट्मोस सपोर्ट देण्यात आले असून, 20 W चा स्पीकर देखील टिव्हीच्या आत देण्यात आलेला आहे.

यामध्ये देखील दुसऱ्या एमआय टिव्हीप्रमाणेच Patchwall देण्यात आला आहे, जे अँड्राईडवर चालते. यामध्ये हॉटस्टार देखील इनबिल्ड आहे.  खास गोष्ट म्हणजे यात नेटफ्लिक्स देखील सपोर्ट करेल. पॅचवॉलमध्ये देखील बदल करण्यात आले असून, यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लॉगइन करण्याची गरज नाही. टिव्ही सुरू करताच कोणतेही लॉगइन करता सर्व पर्याय दिसतील. Patchwall UI मध्ये लाइटमोड देखील देण्यात आला आहे.

(Source)

कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ 5 सपोर्ट देण्यात आले असून, MI TV 4X मध्ये Quadcore Cortex A55 Proceesor देण्यात आलेला आहे. 65 इंचचा टिव्ही अँड्राईड डाटा सेव्हरबरोबर येणारा जगातील पहिला टिव्ही आहे.

65 इंच टिव्ही वगळता इतर टिव्हींची 29 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ची विक्री सुरू होणार आहे. 65 इंच टिव्हीची 29 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर सुरू होणार आहे.

Leave a Comment