शाओमीचा स्मार्ट वॉटर प्युरीफायर आणि मोशन सेंसिंग लाइट भारतात लाँच


चीनी कंपनी शाओमीने आज भारतीय बाजारात स्मार्ट कनेक्टिविटी असलेला स्मार्ट वॉटर प्युरीफायर आणि मोशन एक्टिविटी नाइट लाइट 2 लाँच केले आहे. नाइट लाइटची क्राउडफंडिंग सेल 18 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे, तर स्मार्ट वॉटर प्युरीफायरची विक्री 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

(Source)

एमआय स्मार्ट वॉटर प्युरिफायर फिचर्स – शाओमी स्मार्ट वॉटर प्युरीफायर (RO+UV) ला भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीने हे स्मार्ट, सुरक्षित आणि सुविधाजनक असल्याचे म्हटले आहे. याला कॉम्पॅक्ट डिझाईन देण्यात आल्याने, सहज कोठेही नेता येऊ शकते. यामध्ये 7 लीटर वॉटर टँक देण्यात आला आहे. याला FDA अप्रूव्ड मटेरियलपासून बनवण्यात आले आहे.

या वॉटर प्युरीफायरला तुम्ही मोबाईलशी देखील कनेक्ट करू शकता. यामध्ये फाइव स्टेज प्युरिफिकेशन देण्यात आलेले आहे. तसेच, रिअल टाइम TDS लेव्हल मॉनिटरिंगचा देखील पर्याय देण्यात आलेला आहे.

यात PPC, RO आणि UV असे तीन कार्टरेजेज देण्यात आलेल आहेत. यातील फिल्टरच्या लाइफबद्दल देखील माहिती मिळेल. हा भारताचा पहिला फिल्टर आहे जो, DIY(डू-इट-यूअरसेल्फ) फिल्टर रिप्लेसमेंट बरोबर येतो. रिप्लेसमेंटसाठी केवळ 30 सेंकद लागतात. या स्मार्ट वॉटर प्युरिफायरची किंमत 11,999 रूपये आहे.

(Source)

एमआय मोशन एक्टिवेटेड नाइट लाइट 2 चे फिचर्स – शाओमीने स्मार्ट वॉटर प्युरिफायरबरोबरच आज एमआय मोशन एक्टिवेटेड नाइट लाइट 2 देखील लाँच केले. यामध्ये दोन सेंसर आहेत. जे मोशन आणि लाइटला सेंस करतील. यामध्ये 360 डिग्री रोटेशनची देखील सुविधा आहे. या मोशन एक्टिवेटेड नाइट लाइट 2 क्राउडफंडिंग किंमत 500 रूपये आहे.

Leave a Comment