अमित शहा यांच्या त्या वक्तव्याचा कमल हसन यांनी घेतला समाचार


चेन्नई – अभिनेता कमल हसन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी भाषेसंबंधी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. कोणीही शहा, सुल्तान किंवा सम्राट भारताच्या विविधतेतील एकतेला आव्हान देऊ शकत नसल्याचे कमल हसन यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांच्या विधानानंतर गेल्या दोन दिवसापासून तामिळनाडूतील राजकीय पक्ष आंदोलन करीत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडण्याचे आवाहन केले. वेगवेगळ्या भाषा, पोटभाषा आणि बोली भाषा या आपल्या देशाची शक्ती आहेत. पण आता देशाला एका भाषेची गरज आहे. परेदशी भाषांना जेणेकरून भारतामध्ये स्थान मिळणार नसल्याचे वक्तव्य अमित शहा यांनी एका कार्यक्रमामध्ये केले होते. त्यानंतर दक्षिणेतील प्रादेशिक राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.

एक व्हिडिओ शेअर करीत कमल हसन यांनी अमित शहा यांच्यावर शरसंधान साधले आहे. जेव्हा भारत प्रजासत्ताक बनला तेव्हा विविधतेतील एकतेचे वचन आम्हाला मिळाले. आता कोणीही शहा, सुल्तान अथवा सम्राट या वचनापासून मागे हटू शकत नाही. इतर भाषांचा आम्ही आदर करतो मात्र आमच्या मातृभाषेचा सन्मान राखल गेला पाहिजे, असे हसन म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले, जळ्ळीकट्टू हे फक्त आंदोलन होते. भाषेसाठीचा संघर्ष आमच्या त्याहून अधिक तीव्र असेल. भारत किंवा तामिळनाडूला अशा संघर्षाची गरज नाही. बंगालीत संपूर्ण देश राष्ट्रगीत असूनही अभिमानाने गातो आणि गात राहील. त्याचे कारण म्हणजे कवि यांनी राष्ट्रगीतात सर्व भाषा आणि संस्कृतीचा आदर राखला असल्याचेही ते म्हणाले. एक देश एक भाषा अशा प्रकारचा मुर्खपणा करु नका, असे आवाहनही कमल हसन यांनी केले आहे.

Leave a Comment