इंडिगोचा बेजबाबदारपणा; 130 प्रवाशांचे सामान दिल्लीतच ठेवून तुर्कीला पोहचले विमान


नवी दिल्ली / इस्तंबूल – इंडिगो या खासगी विमान कंपनीच्या चुकीमुळे 130 प्रवाशांना परदेशी जाऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. वास्तविक, दिल्ली ते तुर्कीची राजधानी इस्तंबूलला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान फ्लाइट 6 ई -11 ने रविवारी इस्तंबूल गाठले, पण ही विमान कंपनी प्रवाशांचे सामान घेऊन जाण्यास विसरली.

एअरलाइन्सच्या या चुकीमुळे प्रवासी प्रचंड चिडले होते. एका प्रवाशाने ट्विट करून म्हटले आहे की, “इस्तंबूलला पोहोचताच विमान कंपनीने प्रवाशांना हे पत्र दिले. त्यामध्ये असे लिहिले होते की, आपले सामान चुकून दिल्लीत सोडण्यात आला आहे. लवकरच ते तुम्हाला परत दिले जाईल. तुम्हाला जो त्रास होत आहे त्याबद्दल क्षमस्व.

दुसर्‍या प्रवाशाने लिहिले, माझ्या वडिलांकडे बॅगेजमध्ये आवश्यक औषधे होती. ते मधुमेहाचे रुग्ण आहेत, ज्यांना दररोज औषधाचा एक डोस घ्यावा लागतो. एअरलाइन्सच्या चुकीमुळे काही प्रवाशांनी गोंधळ उडाला. त्यानंतर क्रु मेंबर्संनी त्यांना शांत केले. या विमानात अनेक देशाचे नागरिक प्रवास करत होते.

या चुकांबाबत एअरलाइन्सने एक निवेदन जारी केले – आमचे कर्मचारी सर्व प्रवाशांचे सामान लोड करण्यास विसरले. विमानाचे सामानाशिवाय उड्डाण केले आहे. प्रवाशांच्या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. लवकरच सर्व प्रवाशांचे सामान त्यांच्याकडे देण्यात येईल.

Leave a Comment