ब्रॅड पिटचा अंतराळवीराला प्रश्न, ‘विक्रम लँडरचे लँडिंग बघितले का ?’


हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटने इंटरनॅशल स्पेस स्टेशन (आयएसएस) वरील अमेरिकन अंतराळवीर निक हेगबरोबर संवाद साधला. आपला आगामी चित्रपट ‘एड एस्ट्रा’च्या प्रमोशनसाठी करण्यात आलेल्या कॉलमध्ये पिटने हेग यांना भारताच्या चांद्रयान 2 च्या विक्रम लँडरविषयी देखील प्रश्न विचारला. पिटने हेग यांना विचारले की, चंद्रावर भारताच्या विक्रम लँडरची अयशस्वी लँडिंग बघितली का ? यावर हेग यांनी नाही असे उत्तर दिले.

आयएसएसवरील अंतराळवीरांना एड एस्ट्रा हा चित्रपट आधीच दाखवण्यात आलेला आहे. 20 मिनिटांच्या व्हिडीओ कॉलमध्ये पिटने हेग यांना अनेक प्रश्न विचारले. अभिनेता जॉन क्लूनी आणि त्याच्यामध्ये कोणाचा अभियन आवडतो, असा प्रश्न विचारल्यावर हेग यांनी हसत हसत ब्रॅट पिटचे नाव घेतले. क्लूनी 2013 मध्ये आलेल्या ग्रॅव्हिटी या स्पेस चित्रपटात अभिनेता होता.

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने देखील भारताच्या चांद्रयान 2 चे कौतूक केले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किमी अंतरावर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता.

Leave a Comment