म्हणून सलमानने सोडला इन्शाल्ला चित्रपट


काही दिवसापूर्वी २०२० च्या ईदला सलमानचा इन्शाल्ला चित्रपट प्रदर्शित केला जात असल्याची बातमी आली आणि पाठोपाठ हा चित्रपट डब्यात गेल्याचीही बातमी आली. त्यामुळे साहजिकच सलमानचे चाहते नाराज झाले होते. पण सलमानने हा चित्रपट का सोडला याचे खरे कारण नुकतेच समोर आले असून त्यामुळे सलमानच्या चाहत्यांची छाती गर्वाने नक्कीच फुलेल.

हम दिल दे चुके सनम या सलमान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्या १९९९ साली आलेल्या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सलमान आणि संजय एकत्र येत होते त्यामुळे प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. यात नायिकेची भूमिका आलिया भट्ट करत आहे. बॉलीवूड लाईफ या वेबसाईटवर दिलेल्या बातमीनुसार या चित्रपटात सलमान आणि आलियाचा किसिंग सीन होता. मात्र सलमानने त्याच्या आणि अलियाच्या वयात असलेले अंतर लक्षात घेऊन किसिंग सीन करण्याचे नाकारले आणि हा चित्रपट सोडला.

अर्थात भाई सलमान याने आजपर्यंत कधीच कुठल्याच चित्रपटात थेट किसिंग सीन केलेला नाही. त्यात आलिया त्याच्यापेक्षा खुपच लहान आहे त्यामुळे त्याने दिग्दर्शकाच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला असे सांगितले जात आहे.

Leave a Comment