चलनात मोठ्या प्रमाणात २०० रु.च्या बनावट नोटा


रिझर्व बँकेने २०१८-१९ च्या नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार बाजारात बनावट नोटांचे प्रमाण लक्षणीय असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यातही आणखी महत्वाचे म्हणजे दोन वर्षापूर्वी चलनात आणल्या गेलेल्या नव्या २०० रु. मूल्याच्या बनावट नोटा सर्वाधिक संख्येने चलनात आल्या आहेत. या बनावट नोटांची संख्या १६० टक्के वाढली असल्याचेही या अहवालात नमूद केले गेले आहे.

या अहवालात अन्य मूल्यांच्या नोटांबाबत दिल्या गेलेल्या आकडेवारीनुसार २ हजार रु. मूल्याच्या २२ टक्के बनावट नोटा चलनात आहेत तर सध्या सर्वाधिक वापर होत असलेल्या ५०० रु. मूल्याच्या बनावट नोटाच्या प्रमाणात १ वर्षात ४५ टक्के वाढ झाली आहे. याचा सरळ अर्थ बाजारात सध्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे.

सर्वसाधारण असे दिसून येते की कोणत्याही देशात मोठ्या मूल्याच्या बनावट नोटा बनविण्यास अधिक प्राधान्य दिले जात असते. पण भारतात सध्या अधिक मूल्याच्या नोटांबरोबर १०,२० आणि ५० रुपये मूल्याच्या बनावट नोटाही बाजारात आहेत. म्हणजे या व्यवसायात असलेल्यांनी नव्या डिझाईनमध्येही घुसखोरी करून बनावट नोटा बनविण्याचा उद्योग चालविला आहे.

Leave a Comment