मोदींचा वाढदिवस, सुरत बेकरीत बनला जगातील सर्वात मोठा केक


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे १७ सप्टेंबरला वयाची ६९ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्ताने सुरत येथील ब्रेडलायनर बेकरीमध्ये जगातील सर्वात मोठा केक बनविला गेला आहे. मोदींच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे प्रतिक म्हणून हा केक बनविला गेला असल्याचे बेकरीचे मालक नितीन पटेल यांनी सांगितले.

हा केक ७ हजार किलोचा आणि ७०० फुट लांबीचा आहे. सुरतच्या सरसाना कन्व्हेन्शन सेंटर मध्ये शहरातील ७०० इमानदार लोकांच्या हस्ते तो कापला जात आहे. जगात आत्तापर्यंत बनविल्या गेलेल्या केक मध्ये हा सर्वाधिक मोठा केक असल्याचा पटेल यांचा दावा आहे. दरवर्षी या बेकरीत मोदींच्या वाढदिवशी भलामोठा केक बनविला जातो आणि गरीब तसेच दिव्यांग मुलांना तो वाटला जातो.

सुरत मधील अतुल बेकरीतर्फे मोदींच्या वाढदिवशी आदिवासी भागातील ३७० शाळेतील १२ हजार कुपोषित मुलांना पौष्टिक भोजनाची पाकिटे वाटली जात आहेत. बेकरीचे मालक अतुल वेकारीया म्हणाले, कुपोषण मुक्त भारत हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्ही आमचे थोडे योगदान देत आहोत.

Leave a Comment