मुकेश अंबानींनी घेतली सेकंडहँड कार


आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. मग कधी मुलामुलीचे लग्न म्हणून असेल, कधी त्यांचे अलिशान निवासस्थान असेल तर कधी त्यांनी कोणत्या नवीन कंपन्या खरेदी केल्या आणि कुठे गुंतवणूक केली याची चर्चा असेल. आता पुन्हा एकदा मुकेश पुन्हा चर्चेत आले आहेत ते त्यांनी नुकत्याच केलेल्या कार खरेदीमुळे. मुकेश यांच्या गॅरेज मध्ये रोल्स राईस, बेन्टले, लोम्बार्गिनी अश्या अनेक एकापेक्षा एक अलिशान कार्स आहेत. तरी त्यांनी नुकतीच एक सेकंडहँड कार खरेदी केली आहे. टेस्ला मॉडेल एस १०० ही त्यांची कार नुकतीच मुंबईत दिसली. तिची नोंदणी रिलायंस इंडस्ट्रीजच्या नावावर असली तरी रिलायंस तिचे दुसरे मालक आहेत. म्हणजे ही कार सेकंडहँड आहे.


अर्थात इतके आश्चर्य वाटण्याचे काही कारण नही. कारण मुळात ही कार इम्पोर्ट केली गेली आहे. मक्लेरेन, एस्टीन मार्टीन या कार्ससुद्धा भारतात अधिकृत विकल्या जात नाहीत आणि त्यामुळे त्या इम्पोर्ट कराव्या लागतात. आणि आयात करताना प्रथम त्या संबंधित कंपनीच्या नावावर रजिस्टर कराव्या लागतात आणि त्यानंतर खरेदीदराचे नाव रजिस्टर केले जाते. म्हणजे या गाड्या खरेदी करणारा कारचा दुसरा मालक ठरतो. टेस्ला एस १०० बाबत हेच घडले आहे आणि त्यामुळे मुकेश यांची ही कार सेकंडहँड गणली गेली आहे.

आता या कारविषयी थोडे. ही कार अमेरिकेत ९९,९९० डॉलर्सला मिळते. भारतात तिच्यावर १०० टक्के आयात कर लागला आहे त्यामुळे ७३ लाख रुपये मूळ किमतीची ही कार मुकेश अंबानी यांना १.५ कोटीला पडली आहे. या कारला १०० किलोवॅट बॅटरी फास्ट चार्जिग सुविधेसह दिली गेली असून ४२ मिनिटात ती ३९६ किमी रेंजमध्ये चार्ज होते. तिचा टॉप स्पीड ताशी २५० किमी आहे आणि ० ते १०० चा वेग ती ४.३ सेकंदात घेते.

Leave a Comment