गुजरातमध्ये पहिल्यांदाच होणार देशातील आगळीवेगळी स्पर्धा


आजवर आपण अनेक स्पर्धांबाबत ऐकले किंवा पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेबाबत सांगणार आहोत, जी आपल्या देशात बहुतेक पहिल्यांदाच होत असेल. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे स्पर्धा. आपल्या देशातील गुजरात या राज्यात पहिल्यांदाच पादण्याची स्पर्धा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल कायपण फेकता राव… पण हे खरे आहे. येत्या 22 सप्टेंबरला सूरत येथे ‘What The Fart’ ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्वात मोठ्या आवाजात पादणा-या व्यक्तीला ट्रॉफीसह 15,000 रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहेत. ही स्पर्धा भारतातील पहिलीवहिली ‘पाद स्पर्धा’ असणार आहे. ही स्पर्धा याआधी ब-याच देशांमध्ये झाली आहे.

कोणाच्या समोर तुम्ही कधी चुकून पादलात किंवा कोणी पादलेले ऐकलात तर अशा वेळी तुमची किंवा त्या समोरच्या व्यक्तीची खूपच नाचक्की होते. तर अनेकांना अगदी मेल्याहून मेल्यासारखे होते. पण ही नैसर्गिक गोष्ट आहे. आपण त्याला कितीही टाळले तरी ते बाहेर पडू शकते. कदाचित तुम्हाला हे वाचताना हसायला येईल पण हे खरे आहे. पण आता येत्या 22 सप्टेंबरला याच पादणा-या लोकांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे. ‘WTF’ ही स्पर्धा सूरतमध्ये रंगणार आहे. जेथे उत्तम आणि मोठ्या आवाजात पादणा-या व्यक्तीला भरघोस बक्षीस आणि काही रक्कम दिली जाणार आहे.

ही अनोखी कल्पना 48 वर्षीय गायक व अभिनेता यतिन संगोई आणि त्यांचे सहकारी मुल संघवी यांची आहे. चीन, अमेरिका या देशांमध्ये अशा स्पर्धा होत असतात. त्याचबरोबर तर त्याचा वर्ल्ड कपसुद्धा आहे. पण भारतात आतापर्यंत अशी स्पर्धा झालीच नसल्यामुळे या स्पर्धेला घेऊन आम्ही खूपच उत्सुक आहोत. या स्पर्धेत मोठ्या आवाजात व एका लयात पादणाऱ्या व्यक्तीला ट्रॉफीसोबतच पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहे. केवळ 100 रुपये भरून या स्पर्धेसाठी तुम्हाला नोंदणी करता येणार आहे.

Leave a Comment